Earn Money Online__________Pay to Click

babalac.com

Wednesday, 23 April 2008

कविता कशी होते ??

येत नाही सांगता
होते कशी कविता
तरी करतो प्रयत्न
मी एक खासा

मनात अवतरते
कागदावर उमटते
कळी हळूच खुलते
तेव्हाच फूल बनते

मनी दु:ख होते
लपविता उसळते
काव्यरुपाने ते
हळूच बाहेर येते

मनी सुख होते
जनी व्यक्त होते
काव्य मनी उमलते
कविता जन्म घेते

कधी साचती विचार
कधी नाना विकार
आत जे जे टोचते
काव्यरुपी उतरते..............................
.........................सुधीर.... रा. ८-२८ वा.

Tuesday, 8 April 2008

अहं ब्रह्मास्मि...


अहं ब्रह्मास्मि...

मीच आहे रे ब्रह्म

मी नाद ब्रह्म, मी शब्द ब्रह्म

मी गीत ब्रह्म, मी संगीत ब्रह्म

मी श्वास, मी उच्छवास

मी ध्वनी, मीच प्रतिध्वनी

मीच प्रकृती, मीच पुरुष

मीच सर्वसाक्षी परमेश्वर

मी आणि तू, तू आणि मी॥

आहोत एकही आणि भिन्नही...

भिन्न असता द्वंद्व असे

एक होता ब्रह्म दिसे........

....... सुधीर, ८ एप्रिल २००८ ००-३४ वा।