Earn Money Online__________Pay to Click

babalac.com

Thursday 14 February 2008

valentine spl... कोहिनूर..

valentine spl... कोहिनूर..


त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे
असे कसे हो तिचे सदा उलटे खोपडे ??
जेव्हा मी ओढतो तिला जवळ ती जाते दूर दूर
मी लांब गेल्यावर मात्र तिच्या मनी हूर हूर ...


तिचे मनी उगा हूर हूर माझे मनी काहूर
येऊ का पुन्हा जवळ बदलून आपला नूर?
मनातल्या मनात मात्र भीती वाटते
मागेल आज ती नक्कीच व्हॅलेंटाईनला कोहिनूर....

जीवन-मरण

जीवन-मरण


जगून घे प्रत्येक क्षण
जरी दारी उभे असे मरण
जगण्याचा या रंग आगळा
मरणाचा त्याहुनि निराळा..

मृत्युस कवटाळण्यापूर्वी
पुन्हा एकदा विचार कर
जगून झाल्यावर पूर्णपणे
मगच मरणाचा विचार कर..

अशाश्वत असे जरी जीवन
आणि शाश्वत असे ते मरण
जगून पूर्ण झाल्याशिवाय
जळणाला मिळणार नाही सरण..

Wednesday 13 February 2008

प्रेम-सर्वस्व

प्रेम-सर्वस्व
मी दिसलो की तू धपापतेस ऊर
अंतरी माझिया एक अनामिक हुरहूर..
दोघेही जरी दिसत असो दूर दूर ....
दोघांचे मनी परी वसे एक काहूर

धडधडता काळीज आर्त येतसे स्वर
स्वर पावूनि कंप करी दुबळे विरही मन
असता दूर दूर वाटे सदा जवळी असावे
तुझे प्रेमपाशी तू मला गे कवळावे

अडवून वाट उभा मी, तू जाऊ नकोस कोठे
घेताच मिठीत मी, विसरशील तू काटे
ओठावर ओठ ठेवूनि, होऊनि जाऊया धुंद
प्रीतिचा तुझ्या ग, मनास माझिया छंद

न दिसता तू मन माझे होई सैर भैर
शोधण्या तुला नजर करी भिर भिर
तनु रंग सावळा, परी चंदनी गंध
तुज पाहता सखे ग मन माझे होई धुंद

निरांजनीची ज्योत तू, मी पतंग होऊन आलो
सखे प्रेमात तुझिया मी बेधुंद होऊनी गेलो
कधी मिळलो ज्योतीमधे मी मलाच कळले नाही,
मिसळून धुरामधी धूर,मी सर्वस्व देवूनी गेलो .....

Tuesday 12 February 2008

त्याचे कळणे आणि जळणे

मैत्रीत तुझ्या प्रेम होते
त्यालाही ते कळत होते
तू कोरलेस हातावर
हृदयी त्याने कोरले होते

कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून
तू जरी मागे होतीस आणि
तो पुढे होता तरीही त्याचे
लक्ष मात्र 'मागे' होते

तुझे ते बस सोडणे बस पकडणे
त्याच्या अंगवळणी पडले होते
वर्गातून त्याच्यासाठी तुझे बाहेर पडणे
त्याच्यासाठी नोट्स लिहिणे लायब्ररीत बसणे
त्यामागील तुझे प्रेम माहीत होते

चिडवल्यावर त्याने तुझे ते लटकेच चिडणे
समजल्यावर त्याला मारत हसणे
फिरताना तुझे सोबत असणे, आणि
केवळ प्रेमापोटी तुझे ओरडणे
यातील तुझे प्रेम त्याला ठावूक होते

त्याच्यासाठी तुझे झुरणे,
मित्रांकडे चौकशी करणे
हे ही त्याला माहीत होते
हे तुझे प्रेम त्याला माहीत होते;

कॉलेजच्या शेवटच्या दिवशी
त्याचे ते मागे वळून पाहणे,
त्याच्या डोळ्यात पाणी येणे
त्याचे तुझ्यावरील प्रेम पण
त्याला पूर्ण माहीत होते...

...पण,

तुझ्यासाठी त्याचे जळणे
तुझ्या प्रेमापोटी राख होणे
ते मात्र तुला माहीत नव्हते

पण आता तू विचारतेच आहेस म्हणून सांगतो,

तो जरी तुझ्यावर प्रेम करीत होता
तरी तुझी 'साथ' करू शकत नव्हता
आणि त्यामागील त्याची 'कारणे '
तुला समजावू शकत नव्हता...

कारण तुला कोलमडलेली
तो पाहू शकत नव्हता...
आणि जरी त्याही परिस्थितीत
तू साथ द्यायची कबूल केले असतेस
तरी तुझी 'साथ' घेऊ शकत नव्हता

...कारण ,
त्याला रक्तातून 'एड्स 'चा संसर्ग झाला होता...

श्रीराम स्मरण



या बैराग्या आहे ठावे जगण्याची जी असे कला,
फिरून येतो शिशिर आणि कुजलेला तो गंध फुला|
रूप नेणता तरीही घेता हवा श्वासाने भरू भरू,
जगण्यामध्ये रंगचि भरण्या श्री रामाला जरा स्मरू||

विसरलास तू जगता जगता जन्म मरण हे चक्र असे
या चक्रातुनि सुटका होण्या, श्रीरामाला पुन्हा स्मरू|
जन्माइतका मृत्युही सुंदर, नजरेला जर समज असे
कोणीही येथे नसे कुणाचे, श्रीरामाला नको विसरू ||

भांबावुनी तू नकोस जावू, मनामधे जरी द्वंद्व असे
दोन्हीही विचार तुझ्या मनाचे,मनी नको विकल्प आणू|
श्रीरामाला स्मरता नेहमी, द्वंद्व मनातून जात असे
या द्वंद्वाला हाकलून देण्या, श्रीरामाला पुन्हा स्मरू||

Friday 8 February 2008

पुन:श्च हरि ॐ

कोण तू कोठली तू
कुठे कधी सांडलेली
कोणी धरला हात तुझा ?
अशी कशी दुभंगलीस तू ??

का तुकडे शरीराचे,
का हृदय, मन विखुरलेले ??
का लोटले डोळ्यात तुझ्या पूर आसवांचे?
अन डोक्यात त्रस्त विचार दाटलेले??

असू दे सरलेला हात तुझा,
असू दे मागचे सर्व सुटलेले,
असू दे ओठ नि:शब्द शिवलेले,
एक हाक मारून तर बघ ,
पुन्हा उभी राहून तर बघ

अजूनही सारे संपले नाही
जिथे ढासळलीस तू,
जिथे कणा तुटून जीव तुझा निसटलेला
तिथूनच पुढे चालून तर बघ
अंतापासून सुरुवात करून तर बघ
पुन:श्च हरि ॐ करून तर बघ...

Thursday 7 February 2008

नृत्य


नाच तू नाच तू, फुलपाखरांसवे ग नाच तू,
घेत भरारी सप्त गगनी मेघांसवे ग नाच तू
नाच तू नाच तू, फुलपाखरांसवे ग नाच तू
नाच तू नाच तू ,गाता गाता नाच तू

जगत जलसा मन्मनीचा नाच तू ग नाच तू,
वाहवा सवे टाळ्यांसवे वाहत वाहत नाच तू,
लोक काही बोलले तरी या गीतांसवे ग नाच तू,
नाच तू नाच तू फुलपाखरांसवे ग नाच तू
नाच तू नाच तू ,गाता गाता नाच तू

बोलू दे जन लोका कितीही कसेही फक्त आता नाच तू,
करू दे जना वाहवा वा वंचना, वंचनेसवेही नाच तू,
लागुनी जिव्हारी घेरलेल्या, बोलांसवे ग नाच तू,
नाच तू नाच तू फुलपाखरांसवे ग नाच तू
नाच तू नाच तू ,गाता गाता नाच तू

आधाराच्या मन्मनातील पाखरांसवे ग नाच तू
जळमटे गेली विरोनी, गाण्यासवे ग नाच तू,
शांत शब्दांच्या आनंदे, आनंदासवे ग नाच तू,
नाच तू नाच तू फुलपाखरांसवे ग नाच तू
नाच तू नाच तू ,गाता गाता नाच तू

नाच तू शब्द-सुरांच्या सुखे सदैव नाच तू,
या नादवेड्या खुळासवे, मन्मनी ग नाच तू,
अंतरंगी उजळणा-या सौख्यदीपांसवेही नाच तू,
नाच तू नाच तू, फुलपाखरांसवे ग नाच तू,
घेत भरारी सप्त गगनी मेघांसवे ग नाच तू
नाच तू नाच तू, फुलपाखरांसवे ग नाच तू
नाच तू नाच तू ,गाता गाता नाच तू

...Sudhir 7-2-08 at 11 p.m.

Wednesday 6 February 2008

जीवन एक शिक्षण...

मूळ उर्दू कवितेचे एक स्वैर भाषांतर.....


एकटे राहायला शिकतोय
मरून जगायला शिकतोय..

मागून मिळवणे शिकलो होतो
मिळवून हरवायला शिकतोय...

सबुरीचा रस्ता बनवून
काचांवर चालायला शिकतोय...

शहर शहर फिरता फिरता
तहानच प्यायला शिकतोय...

जीवनाच्या अजब त-हा
जिवंत राहायला शिकतोय...

बेजबाबदारीने फार सतावलेय
जबाबदारीने वागायला शिकतोय...

Tuesday 5 February 2008

एक खट्याळ चारॊळी.....

वाहतील तुझे डॊळे, भरून जाईल तळे
सांग मी का तुला, रडवले उगाच बळे ??
वाहतील तुझे डॊळे, गुलाबी गालावर पडतील डाग ...
म्हणून तर म्हटले तुला, आधी मला रुमाल माग.........

ऐकताय ना बापू......




ऐकताय ना बापू......

तुमच्याच सत्य अहिंसेच्या तत्त्वांना फासला जातॊय हरताळ
तुमचाच वारसा सांगणा-या तुमच्या स्वघॊषित वारसांकडून ...

तुमच्या वधानंतर ब्राह्मणांवर सूड
इंदिराजींनंतर शीखांचे शिरकाण
कधी बिहारमध्ये डॊळे काढतात
कधी नागव्याने धिंड काढतात
कधी खैरलांजी कधी आणखी काही
यादी काही संपत नाही ...

तुमची ती तीन माकडे ...

आज तॊंडावरचे हात काढून,
नेहमीच वंगाळ बॊलतात ..
डॊळ्यावरचे हात काढून,
फक्त वाईट बघतात ..
आणि कानामागे हात नेऊन,
नीट कान देऊन फक्त वाईट ऐकतात ....

एका नेत्याच्या हत्त्येला फाशी
आणि देशाच्या सार्वभौम संसदेवर
हल्ला करणा-या जवानांच्या खुन्याला
अफजल गुरुला मात्र माफी !!!

मतांसाठी लाचारी, देशाविरुद्ध गद्दारी ...
स्वातंत्र्यापासून सुरू झालेला हा स्वैराचार ...
सत्त्यापासून फारकत अन् असत्त्याचा आधार ..

तुमच्या नावाचा हा बाजार संपणार कधी ...
सत्त्याला खरा वाली मिळणार तरी कधी ...
सत्त्याला खरा वाली मिळणार तरी कधी ??



अमृत
आम्ही नाही भांडत गांधींना
किंवा सावरकरांना शिव्या देऊन
आम्ही पाहतॊय दॊघांच्याही
विचारांचे मंथन करून

जे चांगले असेल ते घ्या
वाईट असेल ते सॊडून द्या
गांधी असॊत किंवा सावरकर
कॊणीही सर्वगुण संपन्न असत नाही
चुका केल्याशिवाय माणूसपण शाबीत हॊत नाही

एकांगी विचार करणार नाही
चर्चा केल्याशिवाय राहणार नाही

काय चूक काय बरॊबर
ठरवू आम्ही आमच्यापुरते
माहीत आहे आम्हालाही
समुद्रमंथनाशिवाय अमृत हाती लागत नाही

विचारांच्या या समुद्रमंथनातून अमृत मिळवण्यासाठी
कॊणालातरी भॊलेनाथ हॊऊन हे हलाहल पचवावे लागणार

टीका हॊते म्हणून आम्ही आमचे विचारमंथन थांबवणार नाही
टीकेचे हलाहल पचवून अमृत मिळवल्याशिवाय राहणार नाही...