Tuesday, 16 September 2008
खामोशी भी बहुत कुछ बयाँ कर जाती है
मेरी खामोशी ने तुम्हें जो सजा सुनाई है,
उससे कईं ज्यादा सजा मैंने भुगती है
कहते हो अपने गिरेबाँ में झाँकने के लिए,
और कुसूरवार हमें ही ठहराते हो
जानकर कभी अन्जान नहीं बना तेरी चाहत से,
मगर कोई और मजबूर था तुम्हारे लिए
जो खामोशी समझ ना सके तुम,
वक्त जो बरबाद कर चुके तुम
इस रंगीन फिजा ऐ मौसम में,
बेकाबू दिल को काबू न कर सके तुम
जानते हो, मानते हो की सब तकदीर का खेल है,
मगर रुसवा हमें करने से बाज़ नहीं आते हो
माना के तकदीर के साथ हम भी थे,
मगर तकदीर हमारे साथ तो नहीं था
अगर तकदीर ने हमारा साथ दिया होता,
तो आज यह मौसम बदला हुआ होता
न तुम हमें रुसवा करते,
न कुछ गीला शिक़वा होता
कहते हो की शिकायत नहीं है कुछ हमसे,
मगर आंसू छलकते हैं तुम्हारे इतनी सी बात से,
प्यार का सच्चा मतलब अगर जानते,
अश्कोंका साथ छोड़ कर जिन्दगी में आगे चलते
...सुधीर
Wednesday, 2 July 2008
राम-कृष्ण...
कृष्ण नाही संपला
कृष्ण नाही पळाला..
कृष्ण नाही कळाला,
कृष्ण नाही वळाला...
शोधसी तू कृष्ण कोठे,
शोधसी तू प्रश्न मोठे..
जो वसे अंतरी तो
शोधसी तू अन्य कोठे...
नीट तू जाण तयाला
प्रतारणा टाळावयाला..
नको तू घालूस घाला,
म्हणोनी कृष्ण संपला...
संपला तो अंतरात्मा
कृष्ण जर का संपला..
अंतरीचा राम तुझ्या
सांग कोठे हरविला ... ??
सुधीर, २-७-२००८, सायं। ६-५० वा
Friday, 20 June 2008
प्रेम हाच तर न्याय खरा ...
प्रेम हाच तर न्याय खरा ...
ज्याने तुमचे मन चोरले
त्याने तर केले उपकार थोर,
मनच तुमचे मोठे चोर...
त्याला सजा कोण देणार
ज्याने तुमचे मन मारले
त्यानेही उपकारच केले
मन उडते वा-यावर...
त्याला सजा कोण देणार
तुमच्या प्रेमाचा घोटला श्वास
कारण प्रेमच करते विश्वासघात
नको तेथे नको तेव्हा,
प्रेम करणे हे तर पाप ...
त्याला सजा कोण देणार
म्हणे भोळ्या प्रेमाशी खेळला डाव
प्रेम कधी नसते भोळे
प्रेम करणे हाच जुगार...
त्याला सजा कोण देणार
प्रेम करता कोणावर
प्रेमावर का सजेवर ?
लुटा-यावर प्रेम करा
सजेचा हट्ट सोडा,
प्रेम हाच तर न्याय खरा ...
Friday, 13 June 2008
सत्य फक्त सत्य असतं...
त्यात काही खोटं नसतं
लावलीत काहीही विशेषणं
तरी सत्य बदलत नसतं
तुमचं आमचं सर्वांच सत्य
एकच असतं सर्व सत्य
प्रकाश जसा आहे सत्य,
अंधारही तितकाच सत्य
फरक पडत नाही सत्यास
असो अंधार वा प्रकाश
सत्याला नको चोरवाट
आणि नको आडवाट
सर्व वेळ सर्व काळ
सत्य एकच तिन्ही त्रिकाळ
सत्य आडवे येते स्वार्थास,
तेव्हा निर्मिला जातो सत्याचा आभास...
Wednesday, 23 April 2008
कविता कशी होते ??
होते कशी कविता
तरी करतो प्रयत्न
मी एक खासा
मनात अवतरते
कागदावर उमटते
कळी हळूच खुलते
तेव्हाच फूल बनते
मनी दु:ख होते
लपविता उसळते
काव्यरुपाने ते
हळूच बाहेर येते
मनी सुख होते
जनी व्यक्त होते
काव्य मनी उमलते
कविता जन्म घेते
कधी साचती विचार
कधी नाना विकार
आत जे जे टोचते
काव्यरुपी उतरते..............................
.........................सुधीर.... रा. ८-२८ वा.
Tuesday, 8 April 2008
अहं ब्रह्मास्मि...
अहं ब्रह्मास्मि...
मीच आहे रे ब्रह्म
मी नाद ब्रह्म, मी शब्द ब्रह्म
मी गीत ब्रह्म, मी संगीत ब्रह्म
मी श्वास, मी उच्छवास
मी ध्वनी, मीच प्रतिध्वनी
मीच प्रकृती, मीच पुरुष
मीच सर्वसाक्षी परमेश्वर
मी आणि तू, तू आणि मी॥
आहोत एकही आणि भिन्नही...
भिन्न असता द्वंद्व असे
एक होता ब्रह्म दिसे........
....... सुधीर, ८ एप्रिल २००८ ००-३४ वा।
Tuesday, 18 March 2008
प्रेम..........
प्रेम..........
प्रेम म्हणजे प्रेम असत,
तुमच आमच 'सेम' असत .......
कधी कवितेत, कधी चारोळीत
उमटलेलं ते एक प्रतिबिम्ब असतं ....
प्रेम म्हणजे वल्गना नव्हे,
प्रेम म्हणजे वासना नव्हे
प्रेम म्हणजे प्रेम असतं
समजायला 'प्रेम' व्हावं लागतं
प्रेम म्हणजे प्रेम असतं
रागातही प्रेम असतं
लोभातही प्रेम असतं
चिडण्यात चिडवण्यात प्रेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमच सेम असतं
तिचं त्याच्यावर आणि त्याचं तिच्यावर
एकदम सेम सेम असतं
आईचही प्रेम असतं
बापाचही प्रेम असतं
ते समजण्यासाठी मात्र,
आई - बाप व्हावं लागतं ......