

अमृत
आम्ही नाही भांडत गांधींना
किंवा सावरकरांना शिव्या देऊन
आम्ही पाहतॊय दॊघांच्याही
विचारांचे मंथन करून
जे चांगले असेल ते घ्या
वाईट असेल ते सॊडून द्या
गांधी असॊत किंवा सावरकर
कॊणीही सर्वगुण संपन्न असत नाही
चुका केल्याशिवाय माणूसपण शाबीत हॊत नाही
एकांगी विचार करणार नाही
चर्चा केल्याशिवाय राहणार नाही
काय चूक काय बरॊबर
ठरवू आम्ही आमच्यापुरते
माहीत आहे आम्हालाही
समुद्रमंथनाशिवाय अमृत हाती लागत नाही
विचारांच्या या समुद्रमंथनातून अमृत मिळवण्यासाठी
कॊणालातरी भॊलेनाथ हॊऊन हे हलाहल पचवावे लागणार
टीका हॊते म्हणून आम्ही आमचे विचारमंथन थांबवणार नाही
टीकेचे हलाहल पचवून अमृत मिळवल्याशिवाय राहणार नाही...
No comments:
Post a Comment