मैत्रीत तुझ्या प्रेम होते
त्यालाही ते कळत होते
तू कोरलेस हातावर
हृदयी त्याने कोरले होते
कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून
तू जरी मागे होतीस आणि
तो पुढे होता तरीही त्याचे
लक्ष मात्र 'मागे' होते
तुझे ते बस सोडणे बस पकडणे
त्याच्या अंगवळणी पडले होते
वर्गातून त्याच्यासाठी तुझे बाहेर पडणे
त्याच्यासाठी नोट्स लिहिणे लायब्ररीत बसणे
त्यामागील तुझे प्रेम माहीत होते
चिडवल्यावर त्याने तुझे ते लटकेच चिडणे
समजल्यावर त्याला मारत हसणे
फिरताना तुझे सोबत असणे, आणि
केवळ प्रेमापोटी तुझे ओरडणे
यातील तुझे प्रेम त्याला ठावूक होते
त्याच्यासाठी तुझे झुरणे,
मित्रांकडे चौकशी करणे
हे ही त्याला माहीत होते
हे तुझे प्रेम त्याला माहीत होते;
कॉलेजच्या शेवटच्या दिवशी
त्याचे ते मागे वळून पाहणे,
त्याच्या डोळ्यात पाणी येणे
त्याचे तुझ्यावरील प्रेम पण
त्याला पूर्ण माहीत होते...
...पण,
तुझ्यासाठी त्याचे जळणे
तुझ्या प्रेमापोटी राख होणे
ते मात्र तुला माहीत नव्हते
पण आता तू विचारतेच आहेस म्हणून सांगतो,
तो जरी तुझ्यावर प्रेम करीत होता
तरी तुझी 'साथ' करू शकत नव्हता
आणि त्यामागील त्याची 'कारणे '
तुला समजावू शकत नव्हता...
कारण तुला कोलमडलेली
तो पाहू शकत नव्हता...
आणि जरी त्याही परिस्थितीत
तू साथ द्यायची कबूल केले असतेस
तरी तुझी 'साथ' घेऊ शकत नव्हता
...कारण ,
त्याला रक्तातून 'एड्स 'चा संसर्ग झाला होता...
Tuesday, 12 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment