प्रेम-सर्वस्व
मी दिसलो की तू धपापतेस ऊर
अंतरी माझिया एक अनामिक हुरहूर..
दोघेही जरी दिसत असो दूर दूर ....
दोघांचे मनी परी वसे एक काहूर
धडधडता काळीज आर्त येतसे स्वर
स्वर पावूनि कंप करी दुबळे विरही मन
असता दूर दूर वाटे सदा जवळी असावे
तुझे प्रेमपाशी तू मला गे कवळावे
अडवून वाट उभा मी, तू जाऊ नकोस कोठे
घेताच मिठीत मी, विसरशील तू काटे
ओठावर ओठ ठेवूनि, होऊनि जाऊया धुंद
प्रीतिचा तुझ्या ग, मनास माझिया छंद
न दिसता तू मन माझे होई सैर भैर
शोधण्या तुला नजर करी भिर भिर
तनु रंग सावळा, परी चंदनी गंध
तुज पाहता सखे ग मन माझे होई धुंद
निरांजनीची ज्योत तू, मी पतंग होऊन आलो
सखे प्रेमात तुझिया मी बेधुंद होऊनी गेलो
कधी मिळलो ज्योतीमधे मी मलाच कळले नाही,
मिसळून धुरामधी धूर,मी सर्वस्व देवूनी गेलो .....
Wednesday, 13 February 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment