Earn Money Online__________Pay to Click

babalac.com

Friday, 8 February 2008

पुन:श्च हरि ॐ

कोण तू कोठली तू
कुठे कधी सांडलेली
कोणी धरला हात तुझा ?
अशी कशी दुभंगलीस तू ??

का तुकडे शरीराचे,
का हृदय, मन विखुरलेले ??
का लोटले डोळ्यात तुझ्या पूर आसवांचे?
अन डोक्यात त्रस्त विचार दाटलेले??

असू दे सरलेला हात तुझा,
असू दे मागचे सर्व सुटलेले,
असू दे ओठ नि:शब्द शिवलेले,
एक हाक मारून तर बघ ,
पुन्हा उभी राहून तर बघ

अजूनही सारे संपले नाही
जिथे ढासळलीस तू,
जिथे कणा तुटून जीव तुझा निसटलेला
तिथूनच पुढे चालून तर बघ
अंतापासून सुरुवात करून तर बघ
पुन:श्च हरि ॐ करून तर बघ...

No comments: